Nashik Corona updates : ओलांडला लाखाचा टप्पा! कोरोनाबाधितांच्या संख्येने चिंता वाढली 

नाशिक : काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्‍णसंख्येत लक्षणीय वाढ होत असून, या वाढीच्‍या केंद्रस्‍थानी नाशिक महापालिका क्षेत्र आहे. शहरी भागात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांच्‍या संख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे.

एक लाखाचा टप्पा ओलांडला

शनिवार (ता. २७)पर्यंत शहरात एक लाख सहा हजार ९१३ बाधित आढळले असून, यापैकी ९१ हजार ९२६ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार १२० बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. तर सध्या शहरात १३ हजारांहून अधिक बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

पुन्‍हा चिंताजनक परिस्‍थिती निर्माण
जिल्‍ह्यात २९ मार्चला पहिला कोरोनाबाधित आढळला. शहरात ६ एप्रिलला गोविंदनगर भागात पहिला बाधित आढळला होता. नंतर शहर परिसरातील विविध भागांत कोरोनाचा फैलाव झाला. दाट वस्‍तीच्‍या ठिकाणांसह विविध भागांत कोरोनाचे रुग्‍ण आढळू लागल्‍याने कन्‍टेमेंन्ट झोनच्‍या संख्येतही वाढ झाली होती. मात्र, नोव्‍हेंबरनंतर नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या आटोक्‍यात येत असल्‍याने शहरातील परिस्‍थिती पूर्वपदावर येत होती. त्‍यातच काही दिवसांपासून पुन्‍हा चिंताजनक परिस्‍थिती निर्माण झाली आहे. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

मृत्‍युदर एक टक्का 
एकीकडे कोरोनाबाधितांच्‍या संख्येत वाढ होत असताना कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या शहरात सर्वाधिक आहे. आतापर्यंत एक हजार १२० बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. शहराचा मृत्‍युदर १.०५ टक्‍के आहे. 

शहरात रुग्‍णसंख्या वाढीचे महत्त्वाचे टप्पे- 
दिनांक रुग्‍ण संख्येचा टप्पा 

२० जून २०२० एक हजार 
२ ऑगस्‍ट २०२० १० हजार 
२३ ऑगस्‍ट २०२० २० हजार 
३१ ऑगस्‍ट २०२० २५ हजार 
२८ सप्‍टेंबर २०२० ५० हजार 
२१ जानेवारी २०२० ७५ हजार 
२४ मार्च २०२१ १ लाख