Site icon

Nashik Crime : अंबडगाव भागात महालक्ष्मी नगर येथे युवकाचा खून

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

सिडको भागात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबड गाव भागातील महालक्ष्मी नगर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणांमध्ये एका सराईतावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली दरम्यान पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयतांना अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचत अटक केली.

मयत गुन्हेगाराचे नाव अक्षय उत्तम जाधव (वय २१) आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे की . शुक्रवारी (दि.२८) रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान तन्मय मनोज गोसावी व आकाश अनिल साळुंखे हे महालक्ष्मी नगर येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर बसलेले असताना अक्षय उत्तम जाधव हा त्याच्या साथीदारांसह त्या ठिकाणी आला. यावेळी त्याचे वाद झाले असता संशयित तन्मय गोसावी याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने अक्षय जाधव यांच्या डोक्यात वार केला दरम्यान या ठिकाणाहून अक्षय स्वतःला वाचविण्यासाठी समोर असलेल्या घराच्या एका बाल्कनीत पळाला दरम्यान गोसावी व साळुंखे हे त्याच्या मागे पळाले व पुन्हा एकदा अक्षयच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याच्या डोक्यात दगड मारला दरम्यान या ठिकाणी असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने अक्षय ला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र संशयित हे त्याला मारतील या भीतीने तो पळून गेला दरम्यान त्याने अंबड पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली असता अंबड पोलीस ठाण्याचे पथक रात्री तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी जखमी अक्षय जाधव यास तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून पोलीस गाडीत बसवून जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी अक्षयला तपासून त्यास मृत घोषित केले. दरम्यान या प्रकरणी संशयित मारेकरी तन्मय गोसावी व आकाश साळुंखे हे फरार होण्याच्या तयारीत असताना अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने त्यांना सापळा रचून तात्काळ अटक केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे, उपनिरीक्षक संदीप पवार आदींसह गुन्हेशोध पथक व पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

मृत अक्षय गुन्हेगारी पार्श्वभूमीचा

या घटनेतील मृत अक्षय उत्तम जाधव हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, शासकीय नोकऱ्यांवर हल्ला, जबरी चोरी, घरफोडी, चोरी यांसारखे १५ गुन्हे दाखल असून नुकतेच त्याला व त्याच्या साथीदारांना अटक करून त्यांच्याकडून पोलिसांनी ३२ तोळे सोने व साडेदहा लाख रुपये रोख असा घरफोडीचा मुद्देमाल जप्त केला होता. अक्षय हा ८ ऑक्टोबर रोजी मध्यवर्ती कारागृह नाशिक येथून जामिनावर सुटला होता. त्याच्या विरोधात यापूर्वी अंबड पोलीस ठाण्याकडून प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती. यापूर्वी २६ डिसेंबर २०२० ते २५ जून २०२१ पर्यंत सहा महिन्याच्या कालावधीसाठी त्याला जिल्ह्यातून हद्दपार देखील करण्यात आले होते.

हेही वाचा :

The post Nashik Crime : अंबडगाव भागात महालक्ष्मी नगर येथे युवकाचा खून appeared first on पुढारी.

Exit mobile version