Nashik Crime : “आधारतीर्थ’मधील खून प्रकरणी तेरा वर्षीय मुलगा ताब्यात

आधारतीर्थ आश्रम त्र्यंबकेश्वर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वरजवळील तुपादेवी फाटयानजीक असलेल्या आधारतीर्थ आश्रमात चिमुकल्याच्या खून प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे. संशयित आश्रमातीलच विद्यार्थी असून त्याने किरकोळ वादातून आलोक विशाल शिंगारे याचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

आधारतीर्थ आश्रमात मंगळवारी (दि. २२) सकाळी 6 च्या सुमारास साडेतीन वर्षीय आलोक शिंगारे याचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालात आलोकचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासात आश्रमातील विद्यार्थांसह कर्मचाऱ्यांचे जाबजबाब घेत मारेकऱ्याचा शोध घेतला. त्यात आश्रमातीलच अल्पवयीन मुलाने आलोकचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलोक व संशयित मारेकऱ्याचा वाद झाला होता. वादातून संतप्त होत संशयिताने मंगळवारी मध्यरात्री आलोकचा खून केला. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा :

The post Nashik Crime : "आधारतीर्थ'मधील खून प्रकरणी तेरा वर्षीय मुलगा ताब्यात appeared first on पुढारी.