Nashik Crime : इन्स्टाग्रामवर शस्त्रासह रिल्स बनविणारे दोघे गजाआड

nashik crime,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

धारदार शस्त्रासह इन्स्टाग्रामवर रिल्स बनवून चमकोगिरी करणाऱ्या युवकास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. फैजान नईम शेख (१९, रा. भारतनगर) असे या संशयिताचे नाव आहे. तर फैजानला तलवार पुरवणाऱ्या सचिन शरद इंगोले (२८, रा. भारतनगर) यालाही पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून गुप्ती जप्त करण्यात आली आहे.

शहरात शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस अंमलदार मुक्तार शेख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित फैजान शेखने इन्स्टाग्रामवर तलवार बाळगत रिल्स तयार केल्याचे समजले. पोलिसांनी खात्री केल्यानंतर वरिष्ठ पाेलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, नाझीमखान पठाण, शरद सोनवणे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, महेश साळुंके, मुक्तार शेख यांच्या पथकाने सापळा रचून फैजानला पकडत त्याच्याकडून तलवार जप्त केली.

त्याच्या चौकशीत त्याने ही तलवार त्याचा मित्र सचिन इंगोले याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी इंगोले यास ताब्यात घेत त्याच्याकडूनही गुप्ती जप्त केली. दोघांविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post Nashik Crime : इन्स्टाग्रामवर शस्त्रासह रिल्स बनविणारे दोघे गजाआड appeared first on पुढारी.