
नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
कामटवाडे येथे शुक्रवारी रात्री किरकोळ भांडणातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडुका मारून खून केला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी हरि दामू निकम याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
मयताचे नाव सदाशिव दामू निकम असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितल्यानुसार, कामटवाडा येथे मयत सदाशिव दामू निकम (५५ ) व त्याचा भाऊ हरि दामू निकम (५०) हे शेजारी राहतात. शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सदाशिव दामू निकम हे घरासमोर रस्त्यावर बडबड करत होते. यावेळी त्याचा भाऊ हरि दामू निकम हा सदाशिव जवळ आला व मला शिविगाळ का करतो अशी विचारणा केली. त्यावरुन दोघांमध्ये वाद होऊन त्याने सदाशिव याच्या डोक्यात लाकडी दंडुका मारला यात सदाशिव हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना सदाशिव यांना मयत घोषित करण्यात आले.
बायडी कैलास सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी हरि दामू निकम याच्यावर भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नाईद शेख करीत आहेत. मयत सदाशिव निकम याच्या पश्यात तीन मुले व दोन मुली असा परिवार आहे.
हेही वाचा :
- Sharad Pawar Resign : शरद पवार विरोधकांचे आधारस्तंभ, निवृत्ती मागे घ्यावी हीच सर्वांची इच्छा – संजय राऊत
- राज ठाकरेंनी काढले अजित पवारांचे व्यंगचित्र, म्हणाले पुढे काय लिहू, गप्प बसा आता..
- Priyanka Chopra : नाकाच्या सर्जरीमुळे चेहराच बदलला अन् मी डिप्रेशनमध्ये गेले; प्रियांकाने सांगितली बदलेल्या नाकाची कहाणी
The post Nashik Crime : किरकोळ वादातून मोठ्या भावाचा खून, डोक्यात मारला लाकडी दंडुका appeared first on पुढारी.