Nashik Crime : चौंडेश्वरीनगरला घरफोडी, सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

घरफोडी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आडगाव येथील चौंडेश्वरीनगर परिसरात चोरट्याने घरफोडी करून सुमारे सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास केला. पाेपट महिरे (६६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने ३ ते ४ जानेवारी दरम्यान, घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. घरातील ७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व तीन हजार रुपयांची रोकड असा दोन लाख १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरात घुसून लॅपटॉप लंपास

पंडीत कॉलनी परिसरातून चोरट्याने युवकाचा लॅपटाॅप चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. शुभम देवरे (१९) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ ते ८ जानेवारी दरम्यान, चोरट्याने घरातून ४५ हजार रुपयांचा लॅपटाॅप चोरून नेला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदिरानगरला घरफोडी

इंदिरानगर येथील बजरंग सोसायटीत चोरट्याने घरफोडी करून सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला आहे. प्रांजल चौधरी (२६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने ७ ते ९ जानेवारी दरम्यान, घरफोडी करून घरातील एक लाख रुपयांची रोकड, शुज, सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख २५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post Nashik Crime : चौंडेश्वरीनगरला घरफोडी, सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.