Nashik Crime : तरुणीचा पाठलाग करीत तिच्यावर शेरेबाजी, तिच्या वडिलांवर हत्याराने वार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वडाळागावात दोघांनी मिळून तरुणीचा विनयभंग करीत तिच्या वडिलांना शिवीगाळ, दमदाटी करीत धारदार हत्याराने मारहाण करीत दुखापत केली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिस ठाण्यात मोइन सिकंदर शेख (२९) व रहिम सिकंदर शेख (१९, दोघे रा. म्हाडा वसाहत, वडाळागाव) यांच्याविरोधात विनयभंग, मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.१५) मोइन शेख याने इमारतीत पीडितेचा पाठलाग करीत तिच्यावर शेरेबाजी केली. त्यामुळे पीडितेने ही बाब तिच्या वडिलांना सांगितली. दोघा संशयितांनी पीडितेच्या वडिलांना शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik Crime : तरुणीचा पाठलाग करीत तिच्यावर शेरेबाजी, तिच्या वडिलांवर हत्याराने वार appeared first on पुढारी.