Nashik Crime : तलवारी घेवून फिरणाऱ्या तिघांना अटक

अटक,www.pudhari.news

नाशिकरोड : येथील पोलीस स्टेशन हद्दीत धारदार हत्यार बाळगणाऱ्या तिघा तरुणांना नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली. यासंदर्भात तिघांवर गुन्हा दाखल झाला असून जीवघेणी हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.

गुप्त बातमीदारामार्फत सपोनि गणेश शेळके यांना द्वारका परिसरातून १०७७ क्रमांकाच्या रिक्षात बसून तीन जण तलवारी घेवून नाशिकरोडच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.18) दुपारी एकच्या सुमारास नाशिकरोड गुन्हे शोध पथकाच्या सपोनि गणेश शेळके, कल्पेश जाधव, रोहीत शिंदे आदींनी छत्रपती शिवाजी पुतळा, रेल्वे स्टेशन बस स्टॅण्ड परिसरात रिक्षाचा कसोशीने शोध घेतला.

त्यावेळी संशयितरित्या फिरणाऱ्या अरबाज अकबर पटेल (वय २३), ताहीर भैया मनियार (वय २२) व दीपक जगन्नाथ वाघमारे (वय २२) सर्व राहणार वडांगळी, ता. सिन्नर यांची झडती घेतली असता त्यांच्याकडील जॅकेटमध्ये गुंडाळून लपवलेल्या ३,५००/- रूपये किमतीच्या अनुक्रमे ३२ इंच आणि २७.५ इंच लांबीच्या दोन लोखंडी चमकत्या धारदार तलवारी मिळून आल्या.

हेही वाचा :

The post Nashik Crime : तलवारी घेवून फिरणाऱ्या तिघांना अटक appeared first on पुढारी.