Nashik Crime : दारूच्या नशेत वॉचमनने केला बिगार्‍याचा खून

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी रोडवरील वाढणे कॉलनी परिसरातील हनुमान मंदिराजवळ सुरू असलेल्या बांधकाम साइटवर वॉचमन व बिगारी यांच्यात दारूच्या नशेत झालेल्या वादातून बिगारी व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (दि. 3) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

बांधकाम साइटवर वॉचमन व बिगारी काम करणारा संशयित योगेश डंबाळे (27, हल्ली मु. नाशिक, मूळ रा. ननाशी, ता. दिंडोरी) याने सतलाल मुकुरी प्रसाद (40, हल्ली मु. नाशिक, रा. नाहर छापला, पडरोना, कुशीनगर, उत्तर प्रदेश) याच्याशी वाद घातला. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत सतलाल हा साइटवर असलेल्या लाकडी बल्ल्यांच्या ढिगार्‍यावर पडला. यात त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. सतपाल प्रसाद यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वेळीच उपचार मिळाले असते असते तर त्याचे प्राण वाचले असते, असे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक साखरे आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आरोपीस तत्काळ ताब्यात घेतले.

तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनीदेखील घटनास्थळी पाहणी केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस पुढील तपास करत असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा :

The post Nashik Crime : दारूच्या नशेत वॉचमनने केला बिगार्‍याचा खून appeared first on पुढारी.