Nashik Crime : दिव्यांग वृद्धेवर 23 वर्षीय तरुणाने केला अत्याचार

अत्याचार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दिव्यांग वृद्धेच्या असहायतेचा फायदा घेत 23 वर्षीय नराधमाने वृद्धेस दगडाचा धाक दाखवत अत्याचार केल्याची संतापजनक घटना नाशिक-पुणे राेडवरील जेतवननगर भागात घडली. उपनगर पाेलिसांनी घटना उघडकीस आल्यानंतर दाेन तासांत संशयितास अटक केली आहे.

साहिल आवारे (रा. जेतवननगर, उपनगर) असे संशयिताचे नाव आहे. ६० वर्षीय पीडितेचा सांभाळ तिचा भाऊ करताे व त्या भावाच्या घराजवळ वास्तव्यास आहेत. संशयित साहिल हा सोमवारी (दि.९) मध्यरात्री घरात शिरला. त्याने पीडितेस दगडाचा धाक दाखवून दमदाटी करत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ताे फरार झाला. दरम्यान पीडितेने हा संपूर्ण प्रकार भावासह नातलग महिलेस सांगितला. त्यानंतर पाेलिसांना माहिती कळवण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून परिमंडळ दाेनचे पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयिताची गाेपनीय माहिती काढून त्यास अटक केली. साहिलविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता ही दिव्यांग असून, पतीच्या निधनानंतर मुलांसह राहत होती. मात्र, मुलाचाही काही वर्षांपर्वी मृत्यू झाला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात संशयित हा रंगारी म्हणून राेजंदारीवर काम करताे. तसेच ताे व्यसनाधीन असून, त्याचे त्याच्या आई वडिलांसाेबत पटत नसल्याची माहिती समाेर आली आहे. त्यास अटक करून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याला काेठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post Nashik Crime : दिव्यांग वृद्धेवर 23 वर्षीय तरुणाने केला अत्याचार appeared first on पुढारी.