Site icon

Nashik Crime : धक्कादायक ! विधवेच्या तोंडाला काळे फासून गावभर धिंड…

नाशिक (चांदवड : पुढारी वृत्तसेवा

पतीच्या दशक्रिया विधीत सहभागी झालेल्या विधवेची सासरच्या लोकांनी मारहाण करीत तोंडाला काळे फासून गळ्यात चपलांचा हार घालून धिंड काढल्याची संतापजनक घटना चांदवड तालुक्यातील शिवरे गावी झाली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, १३ महिलांविरोधात वडनेर भैरव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवरे गावातील ३५ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या पतीचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. त्या सोमवारी (दि.३०) सकाळी नऊच्या सुमारास पतीच्या दशक्रिया विधीत सहभागी झाल्या होत्या. शिवरे गावातील खंडेराव मंदिराजवळ पाराशरी नदीपात्रात विधी सुरू असताना पतीचा घातपात झाल्याचा संशय पीडितेने वर्तवला होता. त्यामुळे सासरच्या महिलांनी पीडितेस मारहाण करत नदीत लोटून दिले. यावेळी पीडितेच्या आईने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता संशयित महिलांनी त्यांनाही मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी ‘हिच्या अंगात देवी आली आहे, हिची पूजा करा, हिला गावात मिरवा’ असे बोलून पीडितेच्या गळ्यात चपलांचा हार घातला, चेहऱ्याला काळे फासले व गावात धिंड काढली. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. संशयितांनी शिवरे गावातून पीडितेची धिंड काढल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी पीडितेने वडनेर भैरव पोलिस ठाण्यात १३ जणींविरोधात फिर्याद दाखल केली असून, मानहानी करण्याच्या उद्देशाने हल्ला, बलप्रयोग करण्यासह मारहाण, जमाव गोळा करणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्यावर दाखल गुन्हा

वैशाली रवींद्र खानझोडे (रा. मुंबईनाका, नाशिक), अनिता सताळे, कल्पना गवळी, मीराबाई सताळे, पूनम सताळे, ज्योती मोरे, मिरी मोरे, मनीषा गांगुर्डे, मंगल पवार, मीराबाई गांगुर्डे, सुगंधा सताळे (सर्व रा. शिवरे, ता. चांदवड), मीना गजाराम, फशाबाई घोगर (दोघी रा. ता. नांदगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

डॉ. नीलम गोऱ्हेंचे पोलिस महासंचालकांना आदेश

महिला अत्याचार घटनांची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दखल घेतली आहे. चांदवड तालुक्यातील घटनेचीही डॉ. गोऱ्हे यांनी दखल घेत पोलिस महासंचालकांना सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महिलांवरील अत्याचार खपवून न घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा :

The post Nashik Crime : धक्कादायक ! विधवेच्या तोंडाला काळे फासून गावभर धिंड... appeared first on पुढारी.

Exit mobile version