Nashik Crime : नांदूर शिवारात जमावाचा गोंधळ

crime

नाशिक : शेत जमिनीत बेकायदेशीररीत्या शिरून जमावाने तेथील काम बंद पाडत गोंधळ घातल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण दिलीप मौले (३८, रा. पिंपळगाव बसवंत) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित उद्धव काठे, गंगाधर काठे, माधव काठे, राहुल काठे, शरद काठे आदींनी बुधवारी (दि. १९) नांदूर शिवारात माैले यांच्या शेतात गोंधळ घातला.

दूधबाजारात दोन गटांत हाणामारी

नाशिक : दूधबाजारातील अब्दुल हमीद रोडवर दोन गटांत हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी दोन्ही गटांतील ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार नानाजी महाले यांच्या फिर्यादीनुसार, संशयित शहाबुद्दीन इब्राहिम पानसरे, सादिक निजामुद्दीन मोंढे, जुलकर हुसेन खोत, फरान चिराग पानसरे, शेख तन्वीर अहमद फीर अहमद, कादिर अमिर पाटकरी, रिप्तेन पानसरे, अकिल, मोंरा, अमीर पाटकरी हे मंगळवारी (दि. १८) रात्री एकमेकांना शिवीगाळ, हाणामारी करताना आढळले. त्यामुळे संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेचा विनयभंग

नाशिक : चप्पल तोडल्याची कुरापत काढून चौघांनी मिळून महिलेचा विनयभंग केल्याची घटना पांडवलेणी येथील बस्ते मळा परिसरात घडली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, रवि बस्ते, नंदू बस्ते, मनीषा बस्ते, पायल बस्ते यांच्याविरोधात विनयभंग, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik Crime : नांदूर शिवारात जमावाचा गोंधळ appeared first on पुढारी.