
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांची कन्या तथा मनी शंकर आय हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. प्राची वसंत पवार यांच्यावर मंगळवारी (दि.१३) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गोवर्धन शिवारातील फार्म हाऊसजवळ अज्ञान हल्लेखोरांनी हल्ला केला.
हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या हल्ल्यात डॉ. पवार गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने सुश्रुत हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी डॉ. पवार यांच्यावर हल्ला झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
हेही वाचा :
- पुणेः सायबर चोरट्यांनी डॉक्टर महिलेची केली फसवणूक
- Andrew Flintoff | अँड्यू फ्लिंटॉफ भीषण कार अपघातात जखमी, एअरलिफ्ट करुन रुग्णालयात दाखल
- पुणेः औषध विक्रेत्याला मारहाण करत लुटले
The post Nashik Crime : नाशिकमधील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्राची पवार यांच्यावर हल्ला appeared first on पुढारी.