Nashik Crime : नाशिकमध्ये गुन्हेगारीत वाढ, भरदिवसात सोनसाखळी चोरांचं थैमान

<p>नाशिकमध्ये शाळा तर सुरू झाल्या मात्र आपल्या मुलीला शाळेत घ्यायला जाणं एका आईला चांगलंच महागात पडलय. सिन्नर शहरातील विजय नगर परिसरात नितीन खैरनार यांच्या पत्नी गुरुवारी दुपारी मुलीला शाळेतून घेऊन घरी निघाल्या होत्या. वारकरी भवनकडे जाणाऱ्या रस्त्याने त्या जात असतानाच समोरुन आलेल्या आर वन 5 दुचाकीवरील दोघांनी खैरनार यांच्या जवळ येऊन दुचाकीचा वेग कमी करत त्यांच्या गळ्यातील दिड तोळे वजनाची 45 हजारांची सोनसाखळी खेचत काही सेकंदात पळ काढला. महिलेने एका हाताने मुलीचा हात पकडला होता तर दुसऱ्या हातात शाळेचे दप्तर असल्याने त्यांना चोरांशी प्रतिकार करता आला नाही. दरम्यान हा संपूर्ण प्रकार रस्त्याच्या कडेलाच असलेल्या एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सिन्नर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झालं आहे. वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये भितीच वातावरण पसरलं आहे.&nbsp;</p>