Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं; अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करत घेतले सेल्फी ABP Majha

<p>नाशकात अल्पवयीन मुलीला बळजबरीने लॉजवर नेऊन अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात काल सकाळी ही घटना घडलीय. शाळेजवळ उभ्या असलेल्या मुलीला खोटं सांगत कारमध्ये बसवून लॉजवर नेलं. तिथं आरोपीने मुलीला धमकावत आरोपीने अत्याचाराचा प्रयत्न करत सेल्फी घेतले. यावेळी हा प्रकार कुणालाही सांगितल्यास वाईट परिणाम होतील अशी धमकीही त्याने दिलीय. भयभयीत मुलीने आईला सगळा प्रकार सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनी आरोपी दानिश खानला बेदम चोप दिला. मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी पीडितेच्या कुटुंबीयांच्या परिचयातील असल्याची माहिती मिळतेय.</p>