Nashik Crime : निफाडला दहा लाखांचा गांजा पकडला

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा
कादवा पुलाजवळ गांजाची चोरटी वाहतूक करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात विशेष पोलिस पथकाला यश मिळाले. पथकाने टोळीकडील दहा लाख रुपये किमतीचा 196 किलो गांजा, स्कॉर्पिओ गाडी, मोबाइल यासह एकूण 15 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विशेष पोलिस पथकाला निफाड येथील शांती नगर त्रिपोली परिसरामध्ये एका पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये काही संशयित व्यक्ती गांजा घेऊन जाताना आढळून आले. पोलिस पथकाने या टोळीतील संशयित सूरज राम शिंदे, अजय संतोष पवार, तुषार भोसले (तिघेही रा. नासिक) व एक आंध— प्रदेशचा रहिवासी अशा चौघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बारदानांच्या गोण्यांमध्ये सुमारे नऊ लाख 81 हजार रुपये किमतीचा 196 किलो गांजा मिळून आला.
संशयितांकडून पोलिसांनी अंमली पदार्थांचा साठा, वाहतूक करणारे वाहन आणि संपर्कासाठी त्यांनी वापरलेले मोबाइल संच जप्त केला. या प्रकरणी निफाड पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध अमली पदार्थ नियंत्रण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा :

The post Nashik Crime : निफाडला दहा लाखांचा गांजा पकडला appeared first on पुढारी.