Nashik Crime : पतीकडून पत्नीचा खून, डोक्यात फावडे घालून संपवलं!

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एकाने पत्नीच्या डोक्यात फावडे घालून खून केल्याची संताप आणणारी घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी या गावात ही घटना घडली. आरती विशाल कापसे (वय 24 वर्षे) असे या विवाहितेचे नाव आहे. याबाबत आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, "आरती हिचा विवाह माडसांगवी येथील विशाल कापसे यांच्याशी 2016 मध्ये पार पडला होता. मात्र लग्नाच्या वर्षभरात सासरच्यांकडून आरतीचा छळ सुरु झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच आरतीचा पती विशाल यास दारुचे व्यसन असल्याचे मुलीचे चुलते कैलास जाधव यांनी म्हटले आहे. काल (16 मे) मध्यरात्री विशालने रागाच्या भरात आरतीच्या डोक्यात फावडे मारल्याने तिचा या घटनेत मृत्यू झाला. या घटनेने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात लताबाई जाधव यांनी फिर्याद दिली.

काय घडलं मध्यरात्री?
कौटुंबिक वादानंतर आरती घरी गेली होती. दहा दिवसापूर्वीच ती सासरी नांदण्यास आली होती. मात्र काल रात्री किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. पती विशाल याने आरतीच्या डोक्यात फावडे घालून आरतीचा खून केला. घटना घडली तेव्हा आरतीचे सासू सासरे घरी नव्हते. मात्र पती विशाल आणि इतर मंडळी घरी होती. कौटुंबिक वाद झाल्याने रागाचा भरात विशालने आरतीच्या डोक्यात फावडे मारले. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र घाव वर्मी लागल्याने तिचा मृत्यू झाला होता.

इतर बातम्या

Nashik Crime : रिक्षाचालकासह साथीदारांची प्रवाशाला मारहाण, रोकड, फोन लंपास; प्रवासी गंभीर जखमी

प्रेमप्रकरणातून पेट्रोल टाकून जाळलं! नाशिकमधील 'त्या' तरुणाची मृत्यूची झुंज संपली; मुलीसह कुटुंबियांवर गुन्हा दाखल