
नाशिक (सिडको : पुढारी वृत्तसेवा
महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी करत तिच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित वैभव शरद कोहोक (रा.लासलगाव) याने पीडित महिलेला ‘तू मला आवडतेस, मला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. जर तू माझ्याशी संबंध ठेवले नाही तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल’ अशी धमकी दिली. त्यानंतर दि.६ डिसेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास संशयिताने पीडित महिला घरी एकटी असताना घरात बळजबरीने घुसून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण शेवाळे करत आहेत.
हेही वाचा :
- पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून ; भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या
- पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांचे होणार सर्वेक्षण
- Maharashtra Winter Session 2022 : कर्नाटकला मस्ती असेल तर आपणही धरणांची उंची वाढवावी
The post Nashik Crime : पतीला ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार appeared first on पुढारी.