
नाशिक : पत्नीस अश्लील व्हिडिओ दाखवून अनैसर्गिक अत्याचार करणार्या पतीसह माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावणार्या सासूविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात अत्याचार व विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पतीने 18 जुलै 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत अनैसर्गिक अत्याचार केले. त्याचप्रमाणे लग्नात मुलाला सोन्याचे दागिने दिले नाही, असे सांगून माहेरून पैसे आण, असा तगादा सासूने लावला. त्याचप्रमाणे सुनेस जेवणास शिळे अन्न देत मानसिक व शारीरिक छळ केला. त्यामुळे भद्रकाली पोलिस ठाण्यात पीडितेच्या पतीसह सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- Asia Cup 2022 : पराभवानंतर अफगाणिस्तान चाहत्यांचा राडा, PAK चाहत्यांना खुर्च्या फेकून मारहाण, Video व्हायरल
- नाशिक : तोतया कृषी अधिकारी पकडला; नगरसूलसह येवल्यात कृषिनिविष्ठा विक्रेत्यांना दमबाजी
- पुणे शहरात संततधार; आठवडाभर मुक्काम; गणेश विसर्जन पावसात होणार
The post Nashik Crime : पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; पतीसह सासूविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.