Nashik Crime : पिस्तूलाचा धाक दाखवून गॅस एजन्सीत जबरी लूट (CCTV)

पिस्तूलाचा धाक दाखवून मालेगाव लूट,www.pudhari.news

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

माजी महापौरांनी शहरातील गुन्हेगारी आणि तपासयंत्रणांविषयी केलेल्या आरोपांना आठवडा होण्यापूर्वीच लुटारुंनी त्यावर शिक्कामोर्तब केले. पिस्तुल आणि धारदार चाकुचा धाक दाखवत दोघांनी सटाणा रोडवरील कलंत्री गॅस एजन्सीत एक लाखांची लूट केली. विशेष म्हणजे ही घटना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. जेव्हा चांगलीच वर्दळ असते. काही मिनिटांतच लूट करुन दोघे दुचाकीने पसार झाले. हा सर्व थरारक घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सोमवारी दिवसभराचे गॅस वितरण करुन चार कर्मचारी एजन्सी कार्यालयात भरणा करुन बसले होते. तेव्हा दोघांनी सिनेमातील दृश्याप्रमाणे आत प्रवेश केला. एकाने पिस्तूल रोखले तर दुस-याने चाकूचा धाक दाखवला.  चौघा कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी खाली बसविण्यात आले. कॅश कुठेय, असे विचारले. एकाने ड्रॉवरमध्ये असल्याचे सांगितले. तत्काळ एकाने साधारण लाखभराची रोकड काढून घेत धूम ठोकली.

त्यांचे बाहेर इतरही साथीदार असतील, असा अंदाज आहे. तत्काळ छावणी पोलिसांना माहिती देण्यात आली. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. परंतु तत्पूर्वीच लुटारू पळ काढण्यात यशस्वी झाले. अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी एजन्सीची पाहणी केली. सीसीटीव्हीत कैद झालेल्या हालचालींची पाहणी करून संशयितांची ओळख पटविण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ :

हेही वाचा :

The post Nashik Crime : पिस्तूलाचा धाक दाखवून गॅस एजन्सीत जबरी लूट (CCTV) appeared first on पुढारी.