Nashik Crime : पैशांचा पाऊस पाडून देण्याचं आमिष दाखवत भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार

<p>पैशांचा पाऊस पाडून देण्याचं आमिष दाखवत एका २७ वर्षीय महिलेवर भोंदूबाबानं बलात्कार केलाय. गंगापूर गाव परिसरात डिसेंबर २०२० मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. स्वत: मौलाना असल्याचं भासवत कामिल गुलाम यासीन शेख या आरोपीनं तीन आठवड्यात तीन वेळा अत्याचार केल्याचा उल्लेख महिलेच्या तक्रारीत करण्यात आलाय. इतर दोन आरोपी शिवराम जेम्स फर्नांडिस आणि अशोक भुजबळ यांनी शेखला गुन्ह्यात मदत केल्याचा आरोपही करण्यात येतोय.</p>