
नाशिक : पुढारी वृत्तसेवा : कुरापत काढून १७ वर्षीय मुलाने २४ वर्षीय युवकावर कोयत्याने वार केल्याची घटना पेठ फाट्याजवळील म्हसोबा मंदिरासमोर रविवारी (दि.१७) घडली. या हल्ल्यात रंगनाथ भीमा जाधव (२४, रा. एरंडवाडी, पेठ फाटा) हा युवक जखमी झाला आहे.
रंगनाथ याच्या फिर्यादीनुसार त्याने एकाकडे कामाचे पैसे मागितले होते. त्यावेळी संशयित दीपक सुनील लोंढे (१९, रा. दिंडोरी रोड) याने पैसे का मागतो, असे विचारले होते. त्यावरून रंगनाथने दीपकला मारले होते. त्याचा राग आल्याने दीपक व एका अल्पवयीन मुलाने रविवारी दुपारी एकच्या सुमारास रंगनाथ यास अडवले. ‘दीपकला का मारले’ अशी कुरापत काढून अल्पवयीन मुलाने रंगनाथवर कोयत्याने वार केला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल असून, पोलिसांनी दीपकला अटक केली आहे.
हेही वाचा :
- नगर : म्हैसगाव सोसायटीचे 95 सभासद अपात्र
- पुणे : सिंहगडावर शुकशुकाट; राजगड बहरला
- रत्नागिरी : गुहागर तलाठी कार्यालय भाड्याच्या खोलीत
The post Nashik Crime : पैशांवरुन वाद, अल्पवयीन मुलाकडून एकावर कोयत्याने वार appeared first on पुढारी.