चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील दुगाव शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास घराचा दरवाजा तोडून चौघां चोरांनी घरात झोपेलेल्या व्यक्तींना चाकूचा धाक दाखवत लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत दोन लाख ३५ हजार रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने व ५० हजार रुपये रोख असा दोन लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुगाव येथील काळूबाईच्या मंदिराजवळील मळ्यात शांताराम सोनवणे (६०) हे कुटुंबीयासमवेत राहतात. रविवार (दि. १७) मध्यरात्री २ च्या सुमारास ३-४ जणांनी सोनवणे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यांनी चाकूचा धाक दाखवत सोनवणे कुटुंबीयांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. घरातील कपाट उघडून ४० हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, सोन्याची पोत, एक तोळे वजनाच्या दोन वाट्या, सोन्याचे मणी; २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे डोरले, १२ हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे कर्णफुले; ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र सोन्याची पोत, २४ हजार रुपये किमतीचे कानातील दागिने, १६ हजार रुपये किमतीची सोन्याची छोटी पोत, ८ हजार रुपयांच्या सोन्याच्या रिंगा, २० हजार रुपयांचे मंगळसूत्र, १२ हजार रुपयांचे कानातील दागिने, ३ हजार रुपयांचे पायातील जोडवे आदी २ लाख ३५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच ५० हजार रुपये रोख असा दोन लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, स्थानिक गुन्हे शाखेचे हेमंत पाटील, चांदवडचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. या घटनेबाबत शांताराम उखा सोनवणे यांनी चार जणांविरोधात चांदवड पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
२५ ते ३५ वयोगटांतील
सोनवणे यांच्या घरी मध्यरात्री घुसलेले ३ ते ४ जण हे अंदाजे २५ ते ३५ वयोगटांतील होते. दोघांनी अंगात काळ्या रंगाचे रेनकोट तर दोघांनी काळे जॉकीट घातले होते. या चारही जणांनी पॅंण्टी गुडघ्यापर्यंत वर केलेल्या होत्या.
हेही वाचा :
- ICC ODI Rankings : भारताची वनडे रँकिंगमधील तिस-या स्थानावर मजबूत पकड
- Veena Jagtap : वीणाचे सौंदर्य न्याहाळत बसले नेटकरी, म्हणाले-अप्सराच जणू ❤️❤️
The post Nashik Crime: मध्यरात्री घुसले घरात, चाकूचा धाक दाखवत तीन लाखांची केली लूट appeared first on पुढारी.