Nashik Crime : महिलेवर अत्याचार, व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी

अश्लिल व्हिडिओ काढून ब्लॅकमेल,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
व्हिडिओ शूट करत तो व्हायरल करुन सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार करणाऱ्यास उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली.

जोहेब जाफर खान असे संशयित आरोपीचे नाव आहे. खान याने पीडित महिला राहात असलेल्या इमारतीच्या परिसरात अनेकदा पाठलाग करून तिला धमक्या देत वेळोवेळी अत्याचार केला होता. तो अत्याचाराचे व्हिडिओ शूटिंग करायचा. ते व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून बदनामी करण्याची धमकी तो सतत देत होता. पीडित महिलेला बळजबरीने गर्भपात करण्याच्या गोळ्या देत त्याने दोनदा गर्भपात घडवून आणला होता. तरुणाच्या धमक्यांना आणि अत्याचाराला कंटाळून अखेर पीडित महिलेने उपनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी खानला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माइनकर व सहायक पोलिस निरीक्षक पगारे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik Crime : महिलेवर अत्याचार, व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी appeared first on पुढारी.