Nashik Crime : महिलेस कारमध्ये लिप्ट देऊन विनयभंग

महिलेचा विनयभंग,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महिलेस कारमध्ये लिफ्ट देऊन तिचा एकाने विनयभंग केला. संशयिताने पीडितेच्या बचावासाठी आलेल्या पोलिसांनाही शिवीगाळ केल्याचा प्रकार माडसांगवी टोलनाका येथे घडला. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी प्रविण शिवाजी पेखळे (४०, रा. माडसांगवी) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या गुरुवारी (दि.१३) लासलगाव येथे जाण्यासाठी नांदुरनाका येथे उभ्या होत्या. त्यांनी लिफ्ट मागून संशयित पेखळेच्या कारमध्ये बसल्या. मात्र संशयिताने पीडितेचा विनयभंग करीत बलात्काराची धमकी दिली. टोलनाक्यावर आरडाओरड केल्याने तेथील नागरिकांनी पीडितेस मदत करीत कार थांबवली मात्र संशयिताने पीडितेस बळजबरीने कारमध्ये ओढले. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर संशयिताने पोलिसांनाही शिवीगाळ केली. याप्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik Crime : महिलेस कारमध्ये लिप्ट देऊन विनयभंग appeared first on पुढारी.