
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आर्थिक नुकसान करण्याच्या हेतूने एकाने दुचाकीची जाळपोळ केल्याची घटना भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शंकर नगर परिसरात घडली. याप्रकरणी किर्ती विक्रम चाबुकस्वार (रा. प्राईड पार्क, शंकर नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात व्यक्तीने गुरुवारी (दि.२९) मध्यरात्री पार्किंगमध्ये शिरून एमएच १५ एफजी ९२८५ क्रमाकांच्या दुचाकीस आग लावली. या आगीत दुचाकी जळून नुकसान झाले आहे. याप्रकरणी जाळपोळ करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मखमलाबाद रोडवर घरफोडी
नाशिक : मखमलाबाद रोडवरील स्वामी जनार्दन नगर परिसरात चोरट्याने घरफोडी करून ३७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. डॉ. नितीन दत्तात्रय रौंदळ (४९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १८ ते २८ डिसेंबर दरम्यान, चोरट्याने घरफोडी करून घरातील देवाच्या मुर्ती, २५ हजार रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस तपास करीत आहेत.
चालकावर हल्ला करीत लुटमार
नाशिक : दुचाकीस्वार तिघांनी मिळून वाहनचालकास अडवून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करीत दुखापत केल्याची घटना नाशिक पुणे रोडवरील समाजकल्याण कार्यालयासमोर गुरुवारी (दि.२९) मध्यरात्री घडली. गणपत ज्ञानोबा माळी (४५, रा. चिंचवड, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते गुरुवारी मध्यरात्री सव्वा तीनच्या सुमारास एमएच १४ एचयु ०७९६ क्रमांकाच्या टेम्पो ट्रॅव्हलरने प्रवाशांसह त्र्यंबकेश्वरच्या दिशेने येत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी वाहन अडवून गणपत यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून दुखापत केली. गणपत माळी यांच्याकडील दोन हजार ६०० रुपयांची रोकड हिसकावून पोलिसांकडे तक्रार केल्यास पुन्हा जाऊ देणार नाही अशी दमदाटी करीत तिघे फरार झाले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्याच्या कार्यालयावर हल्ला
- नगर : विनापरवाना आरागिरणी बंद !
- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस : पुतळा प्रकरणातील राजापूरच्या युवकांवरील गुन्हे मागे घेतले जातील; आ. नरेंद्र दराडे यांची लक्षवेधी
The post Nashik Crime : शंकर नगर परिसरात दुचाकी जाळली appeared first on पुढारी.