Nashik Crime : शहरातील अट्टल चोर पोलिसांच्या जाळ्यात

arrested

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरात चेनस्नॅचिंग, मोबाइल चोरीसह दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनिट १ ने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यातही पोलिसांना यश आले आहे.

पोलिस ठाण्यात दाखल विविध गुन्ह्यांचा युनिट १ कडून तपास सुरू असताना पोलिस नाइक काठे यांना गुप्त बातमीदारामार्फत सराईताबाबतची माहिती मिळाली. नफीज सय्यद याने साेनसाखळी चोरी व मोबाइल चोऱ्या केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागूल, हवालदार नाझीमखान पठाण, नाइक विशाल देवरे, प्रशांत मरकड या पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने संशयिताचा शोध घेऊन त्यास अंबड परिसरातून ताब्यात घेतले. त्याचे नाव विचारले असता त्याने नफीज रफीक सय्यद (२१, सिंहस्थनगर, सिडको) असे सांगितले. त्याने त्याच्या साथीदारांसोबत शहरात विविध ठिकाणी रस्त्याने जाणाऱ्यांचे मोबाइल बळजबरीने हिसकावून घेतल्याची कबुली दिली. तसेच एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली व काळ्या रंगाची पल्सर चोरल्याचीही कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल जप्त केले असून, त्याच्याविरुद्ध चेनस्नॅचिंग, तीन मोबाइल जबरी चोरी, दुचाकी चोरी असे एकूण पाच गुन्हे दाखल उघडकीस आणले आहेत. पुढील कारवाईसाठी संशयिताला मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

हेही वाचा :

The post Nashik Crime : शहरातील अट्टल चोर पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.