
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले आहेत. संशयितांनी धारदार शस्त्रांनी वार करून महिला डॉक्टर व युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गंगापूर व मुंबईनाका पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत वॉड बाॅयने डॉक्टरवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गंगापूर रोडवरील निम्स हॉस्पिटल येथे घडली. सुकदेव नामदेव आव्हाड (५४, रा. गंगापूर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित वॉर्ड बॉय अनिकेत डाेंगरे (रा. संत कबीर नगर) याने रविवारी (दि.२५) रात्री साडे आठच्या सुमारास डॉ. सोनल अविनाशदराडे यांच्यावर कात्रीने हल्ला करून मानेवर, पोटात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आव्हाड यांच्या फिर्यादीनुसार, दुपारी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून संशयित अनिकेतने कात्रीने डॉ. सोनल यांच्यावर वार करीत गंभीर जखमी केले. गंगापूर पोलिस ठाण्यात अनिकेत विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या घटनेत चौघांनी मिळून नरेंद्र राजेंद्र खैरनार (२३, रा. भद्रकाली) याच्यावर प्राणघातक हल्ला केला. नरेंद्रच्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.२५) रात्री सव्वा दहाच्या सुमारास गणेश बाबारोड येथे संशयित राहुल ब्राम्हणे, तौसिफ पिंजारी, आदित्य गायकवाड व ललीत शिंदे (सर्व रा. बजरंगवाडी) यांनी कुरापत काढून मारहाण केली. तर संशयित राहुलने नरेंद्रच्या डोक्यात दगड मारून व धारदार शस्त्राने वार करून नरेंद्रला गंभीर जखमी केले. मुंबईनाका पोलिस ठाण्यात चौघांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- दै. पुढारी विशेष शैक्षणिक : शिक्षणच नव्हे तर व्यक्तिमत्त्व घडविणारे दिल्ली पब्लिक स्कूल
- कोरोनासाठी नाकातून घ्यायची लस : जाणून घ्या किंमत; ‘या’ तारखेपासून होणार उपलब्ध | Covid Nasal Vaccine Price
- Tunisha Sharma : मुलीचे पार्थिव पाहून वनिता शर्मा पडल्या बेशुद्ध
The post Nashik Crime : शहरात दोघांवर प्राणघातक हल्ले, धारदार शस्त्रांनी वार करून… appeared first on पुढारी.