Nashik Crime : सिडकोत व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

crime

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

सिडको परिसरातील पवननगर येथील व्यावसायिक तरुणावर जुन्या भांडणाची कुरापत काढून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पवननगर येथे पाववडा विक्रेता महेश सुनील संगपाळ याचे काही सराईत गुन्हेगारांशी जुने भांडण होते. हे भांडण संपवून टाकू असे सांगत त्यास (दि. ११) रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान केवल पार्क परिसरात बोलविण्यात आले. त्यावेळी संशयितासह अन्य दोन साथीदारही असल्याचे समजते. या तिघांनी मिळून महेश वर कोयत्याने सपासप सात ते आठ वार करून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

वार करून केवल पार्क नजीक एका नाल्याजवळ त्यास टाकून त्या तिघांनी पलायाण केले. जखमी अवस्थेत हीव्हळत असलेल्या महेश जवळून जाणाऱ्या एका महिलेने धाडस करीत त्याच्याच मोबाईल मधील एका व्यक्तीस घटना स्थळी बोलवून घेतले. त्या व्यक्तीने त्यास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून याबाबत अंबड पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

 

The post Nashik Crime : सिडकोत व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला appeared first on पुढारी.