Nashik Crime : हिरावाडी’त पूर्ववैमनस्यातून युवकावर धारदार शस्त्राने वार

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

हिरावाडी रोड परिसरात एका युवकावर पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार केल्याची घटना मंगळवारी (दि. ११) रात्री साडे दहा वाजता घडली असून या घटनेत २७ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, त्रिमूर्तीनगर परिसरातील काही युवकांचा गेल्यावर्षी काही युवकांसमवेत वाद झाला होता. त्यावेळी अमृतधाम साईनगर येथे राहणाऱ्या व्यंकटेश शर्मा (२२) याची हत्या झाली होती. कदाचित त्याच वादातून सचिन जोशी याच्यावर मंगळवारी रात्री अज्ञात संशयितांनी धारदार शस्त्राने वार केल्याचा संशय आहे. जोशी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हल्ला झाल्याचे समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्यासह गुन्हा शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्याप्रकरणी ३०७ अन्वये पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही संशयितांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post Nashik Crime : हिरावाडी'त पूर्ववैमनस्यातून युवकावर धारदार शस्त्राने वार appeared first on पुढारी.