Nashik Crime : अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरायचे मोबाईल, दोघांना अटक

मोबाईल चोरांना अटक,www.pudhari.news

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

येथील आठवडे बाजारातून मोबाईल चोरीच्या घटना वाढत असून लासलगाव पोलिसांनी आंतरराज्य टोळीला अटक केली आहे. हे मोबाईल चोरटे 10 ते 12 वर्ष वयाच्या मुलांच्या मदतीने मोबाईल चोरी करत होते. त्यांच्या ताब्यातून 3 लाख 31 हजार रुपयांचे 24 मोबाईल जप्त करण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. (Nashik Crime)

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की., लासलगाव येथील आठवडे बाजारातून सकाळच्या दरम्यान खंडू बाबुराव वाळके यांचा मोबाईल चोरीस गेला होता. वाळके यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चोरांचा शोध सुरु केला. (Nashik Crime)

नाशिक ग्रामीण पोलीस अध्यक्ष सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे आणि निफाड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक अजिनाथ कोठुळे, कैलास महाजन, पोलीस नाईक योगेश शिंदे, देवीदास पानसरे, संजय देशमुख, पोलीस कॉन्सेबल प्रदिप आजगे, भगवान सोनवणे, सागर आरोटे, सुजय बारगळ आदींचे पथक या चोरांच्या शोधासाठी कार्यरत झाले.

पोलिसांनी याप्रकरणी, सुरज कुमार अर्जुन माहातो ( झारखंड) यास ताब्यात घेतले.  त्याची सखोल चौकशी केली असता तो व त्याचा साथीदार कुणाल कुमार रामरतन माहातो (झारखंड) हे इतर दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये भरणाऱ्या आठवडे बाजारातून मोबाईल चोरी करत असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तीन लाख 31 हजार रुपये किमतीचे 24 मोबाईल फोन जप्त करण्यात आले.  दोघा आरोपींना एक ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश निफाड न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. याप्रकरणी लासलगाव पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ कोठाळे,  भगवान सोनवणे अधिक तपास करत आहे.

हेही वाचा :

The post Nashik Crime : अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरायचे मोबाईल, दोघांना अटक appeared first on पुढारी.