Nashik Crime : कॉलेज जवळ पिस्तूल घेऊन फिरत होता, पोलिसांकडून अटक

पिस्तूल बाळगणा-यास अटक,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका संशयित गुन्हेगारास (Nashik Crime) नाशिकरोड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली असून, त्याच्याकडून गावठी पिस्तूलासह एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

एक सराईत गुन्हेगार सामनगाव रोडवरील पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानाजवळ पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शोध पथकाचे विष्णू गोसावी व सागर आडणे यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक गणेश नायदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामनगाव रोडवर सापळा रचला. पोलिसांना बघताच संशयित पळू लागला. त्यानंतर पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीअंती त्याचे नाव अक्षय गणेश नाईकवाडे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर झडतीत त्याच्याजवळ गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस आढळले. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश नायदे, राजू पाचोरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, हवालदार अविनाश देवरे, विष्णू गोसावी, सोमनाथ जाधव, सागर आडणे, केतन कोकाटे, संजय बोराडे, अरुण गाडेकर, गोवर्धन नागरे यांचे कौतुक केले.

हेही वाचा :

The post Nashik Crime : कॉलेज जवळ पिस्तूल घेऊन फिरत होता, पोलिसांकडून अटक appeared first on पुढारी.