Nashik Crime : गोळीबार करणाऱ्या आठ जणांवर मोक्का

गोळीबार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पूर्ववैमनस्यातून सातपूर येथे एका टोळक्याने गोळीबार करून एकावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गोळीबार करणाऱ्या टोळीतील आठ जणांवर मोक्कानुसार कारवाई केली असून, त्याचा तपास सहायक पोलिस आयुक्तांमार्फत होणार आहे.

आशिष राजेंद्र जाधव (२८), भूषण किसन पवार (२६), रोहित मंगलदास अहिरराव (२७), गणेश राजेंद्र जाधव (२६), किरण दत्तात्रय चव्हाण (२४), सोमनाथ झांजर ऊर्फ सनी (२२, सर्व रा. शिवाजीनगर, सातपूर), अक्षय भारती, चेतन अशोक इंगळे अशी मोक्कानुसार कारवाई झालेल्या संशयितांची नावे आहेत. कार्बन नाका परिसरात १९ मार्च रोजी दुपारच्या सुमारास संशयितांनी तपन जाधव व त्याच्या मित्रावर गोळीबार केला होता. तसेच धारदार शस्त्रांनी तपनवर वार केले. हल्ल्यानंतर संशयित फरार झाले होते. दरम्यान, पोलिस तपासात गुन्ह्यातील संशयितांचा आकडा वाढला असून, संशयित सराईत गुन्हेगार असल्याचेही आढळून आले. त्यामुळे पोलिस आयुक्त शिंदे यांनी या गुन्हेगारांच्या टोळीवर वचक ठेवण्यासाठी मोक्कानुसार कारवाई केली. रविवारी (दि.१६) या टोळीतील आठ संशयितांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हे प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली आहे.

हेही वाचा : 

The post Nashik Crime : गोळीबार करणाऱ्या आठ जणांवर मोक्का appeared first on पुढारी.