Nashik Crime : जबरी चोरी करणाऱ्यास केलं गजाआड

चोराला अटक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जबरी चोरी करणाऱ्या संशयितास खंडणी विरोधी पथकाने छत्रपती संभाजी नगर मार्गावरून पकडले. रवींद्र दिलीप गांगुर्डे (३५, रा. निलगीरी बाग) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.

प्रसाद शरद देशमुख (२४, रा. जेलरोड) याच्या फिर्यादीनुसार, ११ मे रोजी तो नांदुरनाका परिसरात असताना संशयित सचीन दाहिया, रवी गांगुर्डे व निलेश माळोदे यांनी कुरापत काढून मारहाण करीत गंभीर दुखापत केली. त्यानंतर संशयितांनी प्रसादकडील १५ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून पसार झाले हाेते. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला. दरम्यान, खंडणी विरोधी पथकाने रवींद्र गांगुर्डे यास सोमवारी (दि.५) पकडले. पथकातील अंमलदार विठ्ठल चव्हाण यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक प्रविण सुर्यवंशी, उपनिरीक्षक दिलीप भोईल, सहायक उपनिरीक्षक दिलीप सगळे, हवालदार किशोर रोकडे, राजेश भदाणे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

The post Nashik Crime : जबरी चोरी करणाऱ्यास केलं गजाआड appeared first on पुढारी.