Nashik Crime : पाच कोटी रुपयांचा बनावट डीडी देऊन फसवलं, सहा जणांविरुद्ध गुन्हा

fraud

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नवीन सोलर प्लांट तयार करण्याकरिता लोन देण्याचे आमिष दाखवून पंचक-जेलरोड येथील एका इसमास पाच कोटी रुपयांचा बनावट डीडी देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राकेश उत्तम बोराडे यांनी या संदर्भात उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बोराडे यांना प्रणव राजहंस, भूषण बाळंदे, नितीन हसे (अहमदनगर), मिलिंद मेश्राम (पुणे) सागर वैरागर (सोनई) व बंटी मेडके या सर्वांनी संगनमत करून बोराडे यांना नवीन सोलर प्लांट तयार करून देतो व त्यासाठी लोन देण्याचे आमिष दाखवले व पाच कोटी रुपयांचा बनावट डीडी देऊन बोराडे यांची फसवणूक केली. हा प्रकार बोराडे यांना समजल्यानंतर बोराडे यांनी उपनगर पोलिस स्टेशन गाठले व तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक चौधरी करत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik Crime : पाच कोटी रुपयांचा बनावट डीडी देऊन फसवलं, सहा जणांविरुद्ध गुन्हा appeared first on पुढारी.