Nashik Crime : पिस्टलसह सराईत गुन्हेगाराला पकडले

पिस्टलसह सराईत गुन्हेगाराला पकडले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गावठी बनावटीचे पिस्टल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारास खंडणी विरोधी पथकाने पकडले आहे. अक्षय गणेश नाईकवडे (२५, रा. सामनगाव रोड, नाशिकारोड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.

खंडणी विरोधी पथकातील अंमलदार एस. बी. जुंद्रे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे देवळाली गावातील आठवडे बाजारात एक संशयित गावठी बनावटी पिस्टल व जीवंत काडतुसे विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजले. त्यानुसार पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सुर्यवंशी, अंमलदार के. जी. रोकडे, बी. एस. सोनवणे, एम. पी. जगझाप, जुद्रें, बी. एस. जाधव यांच्या पथकाने सापळा रचून अक्षय नाईकवडे यास पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी २५ हजार ५०० रुपयांचा पिस्टल, मॅग्झीन व १ जीवंत काडतुस असा मुद्देमाल जप्त केला आहे. अक्षय विरोधात जबरी चोरी, प्राणघातक हल्ला, जाळपोळ, खंडणी अशा स्वरुपाची सहा गुन्हे दाखल आहेत. पथकाने त्याच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा : 

The post Nashik Crime : पिस्टलसह सराईत गुन्हेगाराला पकडले appeared first on पुढारी.