Nashik Crime : भाजीपाला खरेदी करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील पोत लंपास

नाशिक : भाजीपाला खरेदी करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्याने लंपास केल्याची घटना ओढा येथे घडली. निलेश मधुकर चव्हाण (३३, रा. ओढा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची आई ओढा आठवडे बाजारात शनिवारी (दि.२५) भाजीपाला खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने निलेश यांच्या आईच्या गळ्यातील ६९ हजार २४० रुपयांची पोत चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत.

प्रवासी वृद्धेचे दागिने लंपास

बसमध्ये चढत असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील पोत चोरट्याने चोरून नेल्याची घटना जिल्हा रुग्णालयासमोरील बसस्थानकात घडली. लता बळवंत सोनवणे (६०, रा. संगमेश्वर, मालेगाव) यांच्या फिर्यादीनुसार, त्या शनिवारी (दि.२५) सायंकाळी ४.३० च्या सुमारास सिडकोत जाण्यासाठी बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी चोरट्याने गर्दीचा फायदा घेत लता यांच्या गळ्यातील ८० हजार रुपयांची पोत चोरून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयभवानी रोडवर भरदिवसा घरफोडी

जयभवानी रोडवरील नंदनवन कॉलनीतील आवटेनगर भागात चोरट्यानेभरदिवसा घरफोडी करून ९६ हजारर ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. शालिनी कृष्णा शंकोळे यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने रविवारी (दि.२६) दुपारी २.४५ च्या सुमारास कडी कोयंडा तोडून घरात शिरून घरातील राेकड व सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विहीरीत बेवारस मृतदेह

उपनगर नाका परिसरातील इच्छामनी लॉन्सजवळील विहीरीत ३० ते ३५ वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचेकाम सुरु आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा ;

The post Nashik Crime : भाजीपाला खरेदी करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील पोत लंपास appeared first on पुढारी.