Nashik Crime : सापळा रचून दुचाकी चोराच्या आवळल्या मुसक्या

नाशिक : दुचाकी चोराला अटक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातून दुचाकी चोरणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पकडलेआहे. योगेश सोमनाथ चव्हाण (१९, रा. पिंपळगाव खांब) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. गुरुवारी (दि.२५) वडनेर दुमाला येथून एकनाथ संपतराव बुटे यांची दुचाकी लंपास झाली होती.

याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास करताना अंमलदार गुलाब सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून योगेशला पकडले. त्याच्याकडून एकनाथ यांची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकनाथचा ताबा उपनगर पोलिसांकडे सोपवला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, अंमलदार सोनार, राजेंद्र घुमरे, सुगन साबरे, सुनील आहेर, प्रशांत वालझाडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा : 

The post Nashik Crime : सापळा रचून दुचाकी चोराच्या आवळल्या मुसक्या appeared first on पुढारी.