Site icon

Nashik Diwali 2022 : बाजारात खरेदीचा महामहोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘दिवाळी सण मोठा, खरेदीला नाही तोटा’ अशी काहीशी स्थिती बाजारात बघावयास मिळाली. रविवार सुटीचा वार असल्याने अनेकांनी खरेदीचा येथेच्छ आनंद घेतला. त्यामुळे वाहने, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, किराणा, सजावटीचे साहित्य, मिठाई अशा सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याचे दिसून आले.

बाजारातील या गर्दीमुळे प्रत्येक रस्ता नागरिकांमुळे तुडुंब भरला होता. शिवाय प्रत्येक विक्रेत्यांकडे ग्राहकांची मोठी गर्दी असल्याने, त्या ठिकाणचे नियोजन करताना विक्रेत्यांची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून आले. दरम्यान, रविवारी दुपारपासून ग्राहकांनी बाजारात मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. नागरिकांनी गेल्या दोन वर्षांनी यावर्षी खरेदीला प्राधान्य दिले. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये टीव्ही, फ—ीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर, साउंड सिस्टिम आदी वस्तूंची खरेदी करण्यात आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तसेच धान्य, किराणा, तेल या वस्तूंच्या खरेदीलाही नागरिकांनी पसंती दिली. ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे मात्र ग्राहकवर्ग चांगलाच सुखावला आहे.

केरसुणी, रांगोळीसह सजावटीच्या वस्तू खरेदीला उधाण
दिवाळी असल्याने बाजारात महिलांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात होती. त्यांनी केरसुणी आणि रांगोळीपासून खरेदीचा प्रारंभ केला. आरके परिसरात त्यासाठीची अनेक दुकाने सजली होती. शेजारी घरसजावटीची वेगवेगळी तोरणे, वॉल हँगिंग, आकाशदीप, रंगबिरंगी दिवे, फ्लॉवर पॉटस् आदी साहित्यही होते. महिलांसह इतर ग्राहकांनी आपापल्या आवडीनुसार या वस्तूंचीही खरेदी केली.

हेही वाचा :

The post Nashik Diwali 2022 : बाजारात खरेदीचा महामहोत्सव appeared first on पुढारी.

Exit mobile version