नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; एमडी ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांनी पकडलेल्या भूषण पाटील व अभिषेक ऊर्फ जर्मन बलकवडे यांच्या पोलिस कोठडीत शुक्रवार (दि. २०) पर्यंत वाढ करण्यात आली आहे. पुणे येथील ससून रुग्णालयात ललित पाटील यास ड्रग्ज पुरवल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (Nashik Drugs Case)
दोघांनी नाशिकच्या शिंदे येथील कारखान्यातून ड्रग्ज तयार करीत त्याचे वितरण केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी दोघांना उत्तर प्रदेश राज्यातून अटक केली. दोघांच्या तपासात अनेक महत्त्वाची माहिती मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला. भूषण पाटीलच्या घरातून पोलिसांनी आठ पेन ड्राइव्ह जप्त केले असून, अभिषेकच्या नातलगाच्या घरातून तीन किलो सोन्याच्या विटा जप्त केल्या आहेत. तसेच या प्रकरणातील इतर सहा संशयितांची नावे समोर आली असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा :
- Shiv Sena Dasara Melava : मुख्यमंत्री शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानावर
- आम्हीही ओबीसींच्या मोठ्या सभेची तयारी करीत आहोत : विजय वडेट्टीवार
The post Nashik Drugs Case : भूषण, अभिषेकच्या पोलिस कोठडीत वाढ appeared first on पुढारी.