Nashik Electric Car : चार्जिंग करताना इलेक्ट्रिक बाईक जळून खाक, नाशिकच्या इंदिरानगर भागातील घटना

<p>तुमची इलेक्ट्रिक बाईक चार्ज करताना काळजी घ्या, कारण तुम्हाला सतर्क करणारी दुर्घटना नाशिकमध्ये काल घडली आहे. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात इलेक्ट्रिक बाईक चार्ज करताना स्फोट होऊन काही मिनिटांत बाईकचा जळून कोळसा झाला. त्यात विजेचे सहा मीटर आणि एक बाईक जळून खाक झाली. सहा कुटुंब राहत असलेल्या ऐश्वर्या रेसिडन्सीमधील या दुर्घटनेत सुदैवानं मोठी हानी टळली. या दुर्घटनेनंतर कालपासून सोसायटीची वीज गायब आहे.</p>