Nashik Gangapur Dam : गंगापूर धरणार फक्त 35% जलसाठा, मनपा आयुक्तांकडून पाणीकपातीचे संकेत
<p>नाशिककरांनो पाणी जपून वापरा असं म्हणण्याची वेळ आता महापालिका प्रशासनावर आलीय आणि ह्याला कारण ठरलय ते म्हणजे पावसाने फिरवलेली पाठ. जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही नाशिकमध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही आणि यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणं तळ गाठतायत. जिल्ह्यात एकूण 24 मोठे व मध्यम धरण प्रकल्प असून यात सध्या फक्त 25 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातही सध्या 35 टक्के पाणीसाठा शिल्लक असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 12 टक्क्यांनी हा कमी आहे आणि या सर्व परिस्थितीमुळे चिंता व्यक्त केली जातीय.</p>