Nashik Godavari: राम तेरी ‘गोदा’ मैली हो गई! गोदामाईचे गुन्हेगार कोण? ABP Majha

<p>गोदावरीत स्नान करून पवित्र होण्याच्या भावनेनं गोदास्नान करणाऱ्या भाविकांना सतर्क करणारी बातमी आहे. कारण गोदावरीचं पाणी पिण्यासाठी तर दूरच, पण आंघोळीसाठीही योग्य नाही, असा निष्कर्ष हरित लवादानं काढलाय. हरित लवादाच्या या निर्णयानंतर महापालिका आयुक्तांनी देखील गोदावरीचं पाणी दूषित असल्याची कबुली दिली आहे. शहरातील 67 नाले, 4 उपनद्या आणि ड्रेनेजचं पाणी जोपर्यंत प्रक्रिया करुन नदीत सोडलं जाणार नाही, तोपर्यंत हे पाणी दूषितच असेल. त्यामुळे नमामी गोदे योजनेच्या माध्यमातून नवे STP प्लांट उभारुन, नदी नाले स्वच्छ करणे आणि कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.&nbsp;</p>