नाशिक : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी आज मंगळवारी (दि. २०) तालुकास्तरावर मतमोजणी होत आहे. नाशिकमधून निकाल हाती लागण्यास सुरुवात झाली आहे. पहिला निकाल हाती आला आहे.  नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी पहिल्या फेरीचे निकाल हाती लागले आहेत. यात चार ग्रामपंचायतींवर भाजप तर एका ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने खाते उघडले आहे.

हाती लागलेला निकाल असा-

1. आडगाव – लताबाई घुले – भाजप,

2. शेलू – अमोल जाधव – भाजप

3. पाटे कोलटेक – रंगनाथ सूर्यवंशी – महाविकास आघाडी

4. निंबाळे – रविना विष्णू सोनवणे – भाजप

5. चिचोले – पवन साहेबराव जाधव – भाजप

जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील १८९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. १८) शांततेत मतदान पार पडले. थेट सरपंच व सदस्य पदांसाठी झालेल्या निवडणुकीत सरासरी ८० टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. दुपारी १२ पर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता असून, त्यानंतरच कोणता उमेदवार विजयाचा गुलाल उधळणार हे स्पष्ट होईल.

 

The post Nashik Gram Panchayat : पहिला निकाल हाती, चांदवड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर appeared first on पुढारी.