Nashik : Helmet असेल तरच दुचाकीस्वारांना पेट्रोल, नाशकात आजपासून हेल्मेट सक्ती : ABP Majha

<p>स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधत नाशिक शहरात आजपासून हेल्मेटसक्ती राबवली जातेय. नाशिकमध्ये हेल्मेट असेल तरच दुचाकीचालकांना आता पेट्रोल मिळणार आहे. हेल्मेटचा वापर करा असं वारंवार आवाहन करूनही अनेक वाहनचालक हेल्मेट घालत नसल्याने अखेर पोलिसांना हे पाऊल उचलावं लागलं. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ही मोहीम सुरु करण्यात आली. आरोग्याची समस्या किंवा ईतर काही विशेष कारणांचा अपवाद वगळता हेल्मेट नसल्यास वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव RTO कडे वाहतूक शाखेकडून पाठवला जाणार आहे.</p>