Nashik Helmet Compulsion : नाशिककरांनो, हेल्मेट घातलं नाहीत तर पेट्रोल मिळणार नाही!

<p>15 ऑगस्टपासून नाशकातल्या दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नसेल तर पेट्रोल मिळणार नाही. वारंवार विनंती करुन अनेक नाशिककरांच्या डोक्यावर हेल्मेट दिसत नसल्यानं पोलिसांनी ही शक्कल लढवली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पेट्रोलपंपावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.</p>