
इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म कंपनीतील स्फोट प्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर कंपनीच्या सात अधिकाऱ्यांवर कामकाजातील त्रुटींबद्दल घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नववर्षाच्या दिवशीच कंपनीतील बॅच पॉलीफिल्म प्रकल्पामध्ये स्फोट होऊन तीन दिवस आग धुमसत होती. या स्फोटात महिमा सिंग, अंजली यादव, सुधीर मिश्रा या तीन कामगारांचा मृत्यू झाला होता, तर २२ कामगार जखमी झाले होते. या दुर्घटनेची चौकशी घोटीचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर करत होते. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने कंपनीच्या सुरक्षा लेखापरीक्षण अहवालाचे परीक्षण केले होते. आग लागलेला बॅच पॉलीफिल्म प्लांट हा सुमारे दीड महिन्यापासून बंद होता. तो सुरू करण्यापूर्वी प्रकल्पातून ऑइलची गळती होऊन मोठा स्फोट होऊन आग लागल्याचे निष्पन्न झाले.
दुर्घटनेप्रकरणी जिंदाल पॉलीफिल्मचे भोगवटदार, फॅक्टरी व्यवस्थापक, प्रकल्प बिझनेस प्रमुख, उत्पादन व्यवस्थापक, देखपाल विभागप्रमुख, प्रोडक्शन डिपार्टमेंट शिफ्ट इन्चार्ज आणि प्लांट ऑपरेटर हे ७ घटक जबाबदार धरत त्यांच्याविरोधात घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा :
- गरीब कैद्यांबाबत सरकारचे उदार धोरण!
- पुणे : अभियंत्याचा आठ जणांना गंडा
- आजचं राशिभविष्य : ‘या’ राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस काळजीचा
The post Nashik Igatpuri : जिंदाल स्फोट प्रकरणी दोन महिन्यांनंतर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.