Nashik Igatpuri : दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिसराही बुडाला

बुडून मृत्यू

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

इगतपुरी येथील नगर परिषद तलावामध्ये 3 जण बुडाल्याची घटना घडली आहे. या घटनेत इगतपुरी येथील स्थानिक युवकासह पाहुणे आलेले दोन जण बुडाले. बुडालेल्या दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिस-याचाही या घटनेत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

अधिक माहितीनुसार, हे तिघे नगर परिषद तलाव येथे फिरण्यासाठी आले होते. या घटनेत रमिज अब्दुल कादीर शेख  (36) रां. भिवंडी, नदीम अब्दुल कादीर शेख (34) रा. भिवंडी हे दोघे तलावाच्या पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्यास गेलेल्या शाहनवाज कादिर शेख (41) यांचाही यात मृत्यू झाला.

नगर परिषद कर्मचारी, जनसेवा प्रतिष्ठान व स्थानिक युवकांनी बुडालेल्या तिघांना बाहेर काढले. त्यास ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले मात्र. तपासणीत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत झाल्याचे कळताच मृतांच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. रुग्णालयात कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. पोलीस प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहे.

हेही वाचा : 

The post Nashik Igatpuri : दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिसराही बुडाला appeared first on पुढारी.