Nashik IPS Deepak Pande : गोदास्नान करणारे IPS अधिकारी, पोलीस आयुक्त दीपक पांडेंची नाशिकमध्ये चर्चा

<p><strong style="margin: 0px; padding: 0px; box-sizing: border-box; font-weight: bolder;">नाशिक :</strong>&nbsp;एरवी खाकी वर्दीत गुन्हेगारीचा बिमोड करणाऱ्या नाशिकच्या पोलीस आयुक्तांचं नव रुप नाशिककरांना बघायला मिळतंय. पोलीस आयुक्त दीपक पांडे चक्क गोदावरी नदीत स्नान करतात, त्यांच्या जोडीला असतात 90 वर्षाचे त्यांचे वडील. त्यामुळे आयुक्तपदाचा थाटबाट सोडून गोदास्नान करणारा पहिला अधिकारी बघायला मिळतोय.&nbsp;</p> <p>बिहार राज्यात गंगा नदी किनारी राहणाऱ्या दीपक पांडे यांची नाशिकला बदली झाली आणि दक्षिण गंगा म्हणून ओळख असणाऱ्या गोदामाईच्या दिशेने ते आकर्षित झाले. गेल्या दहा महिन्यापासून दीपक पांडे आणि त्यांचे 90 वर्षीय पिता शिवानंद पांडे रोज पहाटे ब्रह्म मुहूर्तावर गोदापत्रात स्नान करतात. एरवी चालताना काठीचा आधार घेणारे शिवानांद पांडे पाण्यात गेल्या गेल्या जो सूर मारतात&nbsp; तो बघून आपला आपल्या डोळ्यावरच विश्वास बसत नाही.</p>