Nashik IT Park : नाशिकमध्ये 10 एकर क्षेत्रावर आयटी पार्क, केंद्र सरकारचा शिक्कामोर्तब

<p>नाशिकमध्ये 10 एकर क्षेत्रावर आयटी पार्क उभारण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय आणि त्यासाठी केंद्राच्या एमएसएमई मंत्रालयाकडून या प्रकल्पावर शिक्कामोर्तबही करून घेतलंय. महापौर सतीश कुलकर्णी यांनी त्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची नुकतीच भेट घेतली होती. या प्रकल्पासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. नाशिकमध्ये आयटी हब तयार करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा सत्ताधारी भाजप करतोय. तर विरोधकांनी याला निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेलं गाजर असल्याचं सांगत टीका केलीय. काही खासगी विकासकांच्या फायद्यासाठी हा घाट घातल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय.&nbsp;</p>